support@samatanira.com

logo

आमचा दृष्टिकोन

संस्थापक/अध्यक्ष मा.श्री.दिलीपदादा यांच्या दुरदृष्टीमुळे समता पतसंस्थेने पुणे जिल्ह्यात सामाजिक व आर्थिक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा निर्माण करुन इतरांकरिता आदर्श निर्माण केलेला आहे.समता सहकारी पतसंस्था मर्यादित,निरा ही आज सर्व सामान्यांच्या दृष्टीने वटवृक्षाची सावली प्रमाणे खंबीरपणे उभी आहे.या वटवृक्षाची पाळेमुळे खोलवर रुजवूण त्याचा लाभ सर्वसामान्य बांधवांना देणेच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे.आत्तापर्यंत केलेले काम अभिमानास्पद आहे,परंतु अपुर्ण राहिलेली कामेही खुप आहेत.

सर्व सामान्यांच्या गरजा पुर्ण करुन संस्थेच्या परिसराचा कायापालट घडवून आर्थिक विकासाचे व प्रगतीचे नवे पर्व निर्माण करावयाचे आहे.त्यासाठी कामाची गती वाढली पाहिजे.आपणासर्वांचे जीवन आनंदी व समृध्द करण्याचे आपले स्वप्न आपणांस साकार करण्याचे आहे.आत्तापर्यंतच्या प्रगतीचा वेग कायम राखत तो कसा वाढेल..! यासाठी सभासद,खातेदार आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.संचालक मंडळ,सभासद,खातेदार अधिकारी वर्ग,कर्मचारी वर्ग व हितचिंतक यासर्वांचे सक्रीय सहभागातूनच हे स्वप्न साकार होईल असा दृढविश्वास आहे.सहकार्य, प्रेम,जिद्द व चिकाटी यांचे जोरावर एक नवा आदर्श आपल्या संस्थेच्या रुपाने समाजात निर्माण करावयाचा आहे.सभासद,खातेदार जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार करून संस्थेच्या प्रगतीला मोलाचा हातभार लावावा अशा अपेक्षा बाळगणे.तसेच कर्जदार सभासदांनी सुध्दा घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमितपणे करुन आपले कर्तव्य पार पाडून समता नागरी पतसंस्थेस सहकार्य करावे व कायदेशीर वसुलीचे कटु प्रसंग टाळावेत व सभासदांना आर्थिक व्यवहाराची शिस्त लागावी हा संस्थेच्या मुख्य “दृष्टिकोन” राहील