संस्थेमध्ये ठेवी स्वीकारताना व कर्ज देतांनाही प्रत्येक सभासदांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेवूनच योजना तयार करण्यात आल्या आहेत .कर्जाच्या अनेक योजना राबवताना विविध घटकांना सेवा देत,राज्यपातळीवर स्थान निर्माण करण्याच्या दिशेने पावले टाकत,सभासद,खातेदार आणि कर्मचारी यांचे मूल्य वाढवित एक चैतन्यमय दूरदर्शी,तंत्रसिध्द आणि ग्राहकानुवर्ती संस्था म्हणून सहकार क्षेत्रात अस्तित्व सिध्द करणे,हे समता नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य उद्धिष्टे पुढील प्रमाणे आहे.
संस्थेचा मुख्य उद्धेश ठेवीदारांचे हित जपणे हा असून..सभासदामध्ये सामाजिक व आर्थिक प्रगती साधने,व सादर प्रगती सहकाराच्या तत्वांनुसार स्वतः साठी व एकमेकांसाठी,एकमेकांच्या मदतीसाठी साधने होय…
सभासदांमध्ये काटकसर,स्वावलंबन व सहकाराची भावना वृद्धिगत करणे.
सभासदांकडून ठेवी स्वीकारणे व त्याचा विनियोग कर्जदेने अथवा गुंतवणूक करणे यासाठी करणे.
सभासदांची आर्थिक परिस्थिती सुधारणेसाठी विविध योजना करून कर्जपरवठा करणे.
संस्थेचे सभासद ठेवीदार व ग्राहक सार्वजनिक संस्था,इतर संस्था व संलग्न संस्था यांना आर्थिक तांत्रिक संगणक आधारित व तदनुषंगिक सेवा पुरविणे
उपरोक्त सर्व व सहकार खात्याने घालून दिलेल्या उद्धेश साधण्यासाठी लागणाऱ्या अनुषंगिक सर्व गोष्टी करणे.