support@samatanira.com

logo

श्री.दिलीप प्रभाकर फरांदे

सन्माननीय सभासद बंधूभगिनींनो,चेअरमन पदाची जबाबदारी पार पाडताना संस्थेच्या यशोशिखराकडे नेणे हे एकच ध्येय समोर ठरविले आहे.संचालक मंडळ,सर्व सभासद, खातेदार,हितचिंतक व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.अलीकडे आधुनिकीकरणामुळे संपूर्ण जग कवेत घेतलेले असताना तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्याकरिता संकेतस्थळाच्या माध्यमातून संस्थेच्या व्यावसायिक प्रगतीची व उपक्रमाची अद्यावत माहिती सादर करताना मला अत्यंत आनंद हॊत आहे.सर्व सामान्य माणसाचे आर्थिक जीवन सहकार्याच्या माध्यमातून उज्वल व्हावे या उद्देशाने एकत्र येवून स्थापन केलेल्या संस्थेने सामाजिक व आर्थिक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा निर्माण करुन इतरांकरिता आदर्श निर्माण केलेला आहे.

विद्यमान संचालक मंडळ,अधिकारी,कर्मचारी यांच्या अपार अपरिश्रमाने व विनम्र सेवेच्या भरवश्यावरच संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु आहे.हे संकेतस्थळ प्रगतीचा,वाटचालीचा आरसा असला तरी आपल्या सहकार्याने व मार्गदर्शन सूचनेने तो अधिक पारदर्शक करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

आपल्या संस्थेत ठेवी स्वीकारताना व कर्ज देतांनाही प्रत्येक सभासदांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेवूनच योजना तयार करण्यात आल्या आहेत.कर्जाच्या अनेक योजना राबवताना त्यात वैक्तीगतकर्ज,व्यवसायकर्ज,मुदतठेव तारण कर्ज,सोनेतारण कर्ज व वाहन तारण कर्ज देण्यात येते.आपल्या संस्थेच्या तीन शाखा कार्यरत असून मुख्य कार्यालय निरा येथे आहे.या सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणालीने जोडलेल्या असल्यामुळे ग्राहकांना सर्व शाखेतून पैशाचे व्यवहार करणे अत्यंत सोपे झालेले आहे.आपल्या प्रत्येक शाखेत तरुण व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत सेवा देत असतात.आर्थिक व्यवहारा सोबतच संस्थेचा सामाजिक कार्यातही सक्रीय सहभाग असतो.

संस्थेच्या स्वमालकीच्या ९ कोटीच्या मालमत्ता,तसेच आपण दरवर्षीच्या नफ्यातून रु.३६ कोटी रक्कमेचे उभारलेले निधी,सुरक्षित बँकांमध्ये रु.९० कोटी रक्कमेची आपण केलेली गुंतवणूक,स्थानिक नामांकीत संचालक सहकारी वर्ग,प्रशिक्षित कर्मचारी आणि आपल्यासारखा सुजाण ग्राहकवर्ग ही संस्थेची बलस्थानं आहेत ! यामुळे कोणतेही नैसर्गिक संकट आले तरी संस्था त्याला समर्थपणे तोंड देऊ शकते,याबाबतीत सर्वांनी निश्चिंत असावे.समाजातील सर्व घटकांना त्यांच्या जवळ चांगल्या दर्जाची बँकींग सेवा पुरविण्यात आपण यशस्वी झालो आहोत.सीबीएस प्रणाली,मोबाईल बँकिंग ॲप,आरटीजीस सुविधा अशा अद्ययावत बँकिंग सुविधा ग्राहक अनुभवत आहेत.लवकरच व्यवसायावाढीसाठी एक आधुनिक सुविधा चालू करण्याचा मानस आहे.संस्थेचा व्यवसाय गतीने गतिमान होत आहे,३१ मार्च २०२३ रोजी आपल्या सर्वांच्या सहकार्याने ३५१ कोटी इतक्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे.

सर्व सामान्यांच्या गरजा पुर्ण करुन संस्थेच्या परिसराचा कायापालट घडवून आर्थिक विकासाचे व प्रगतीचे नवे पर्व निर्माण करावयाचे आहे.त्यासाठी कामाची गती वाढली पाहिजे.आपणासर्वांचे जीवन आनंदी व समृध्द करण्याचे आपले स्वप्न आपणांस साकार करण्याचे आहे.संचालक मंडळ,सभासद,खातेदार अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग व हितचिंतक या सर्वांचे सक्रीय सहभागातूनच हे स्वप्न साकार होईल असा दृढविश्वास आहे.

आत्तापर्यंतच्या प्रगतीचा वेग कायम राखणेसाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.संस्थे बद्दल निष्ठा व आपुलकी जपणारे आपले कर्तव्य तत्पर कर्मचारी व दैनंदिन बचत प्रतिनिधी,संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे लेखापरीक्षक,कायदे सल्लागार,हितचिंतक सभासद आणि मोलाचे मार्गदर्शन करणारे सहकार खात्याचे अनेक अधिकारी यांच्या समर्थ व सार्थ सहकार्यामुळेच आज आपली संस्था यशस्वीपणे उभी आहे.आजपर्यंत आपले संस्थेस विविध अशा पुरस्कारांनी सन्मानित केलेले असून आपले असेच बहुमोल सहकार्य संस्थेला लाभो व संस्थेची वाटचाल उत्तुंग शिखरावर पोहोचो हिच सदिच्छा….या यशस्वी वाटचालीतील आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद ! आपले सहकार्य असेच मिळत राहो हीच अपेक्षा धन्यवाद !