support@samatanira.com

logo
All Loan b
Services- E-Services
mobile banking a
mobile banking 5
mobile banking 4
mobile banking 3
mobile banking 2
mobile banking 1
Deposit
Banking
Banking
previous arrow
next arrow

समता पतसंस्था संस्थेचा इतिहास

विश्वासाची परंपरा जोपासणारी पतसंस्था अशी संस्थेची ओळख आहे.समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून पुणे आणि सातारा जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक,व्यापारी व उद्योग समुहातील कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांची कामे व्हावीत व गरजू तरुणांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध व्हावे.याप्रेरणेने २३ डिसेंबर १९९८ रोजी संस्थेची स्थापना केली.आज मितीस पतसंस्थेची आदर्शवत वाटचाल सुरु असून संस्था सातत्याने उद्योग समुहातील कर्मचारी,छोटे-मोठे व्यावसायिक,शेतकरी तसेच हातगाडी वरती व्यवसाय करणारे सामान्य माणसांच्या विकासासाठी कर्ज पुरवठा करत आहे.तसेच ठेवीदारांचे पैसे मागता क्षणी तात्काळ दिले जातात.त्यामुळे परिसरातील विश्वासाची परंपरा जोपासणारी पतसंस्था म्हणजे “समता पतसंस्था ” म्हणुन नावारुपाला आलेली आहे.

संस्थेच्या कारभारात संचालक मंडळ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.मा.श्री.दिलीप(दादा)प्रभाकर फरांदे रा.निंबुत ता.बारामती हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून व मा.श्री.उत्तम किसनराव आगवणे रा.निरा ता.पुरंदर,हे व्हाईस चेअरमनपदी कामकाज पहात आहेत.मा.श्री.युवराज नारायण फरांदे हे संस्थेचे मुख्यव्यवस्थापक तथा सचिव म्हणुन व मा.श्री.राहुल कुंडलिक ढोले हे संस्थेचे व्यवस्थापक म्हूणन काम पहातात.तसेच संस्थेत व्यवस्थापकीय संचालक मंडळ तज्ज्ञ संचालकांसह १३ सदस्यांचे असुन एकुण ६० कर्मचारी व दैनिक बचत प्रतिनिधी ५३ आज मितीस काम करत आहेत.

संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून संस्थेने यशस्वी वाटचाल करुन सर्व स्थरांवर भरीव व भक्कम प्रगती केलेली आहे व करीत आहे .३१ मार्च २०२३ अखेर संस्थेचे एकुण सभासद संख्या १७९१६ इतकी आहे.तसेच वसुल भागभांडवल रु.३.७५ कोटी आहे.अहवाल सालात संस्थेचा एकुण निधी ३६ कोटी आहे आणि खेळते भांडवल रु.२४० कोटी आहे.संस्थेस स्थापने पासून गुणवत्तेवर आधारित ऑडीट वर्ग ‘’अ’’ कायम मिळत आहे,ही अभिमानाची बाब असुन सभासदांना दर वर्षी लाभांश दिला जात आहे.संस्थेच्या एकुण ठेवी रुपये २०० कोटीच्या पुढे असून संस्थेने १३६ कोटीच्या पुढे कर्ज वाटप केलेले आहे.

संस्थेने निधीची गुंतवणुक सहकारी कायदा कानुन मधील तरतुदी नुसार केलेली आहे.एन पी.ए.ची संपूर्ण तरतुद करून आज अखेर निव्वळ एन पी.ए. २.७७ टक्के आहे.तसेच संस्थेचा सी.आर.ए.आर १६.४६ टक्के आहे.यावरून संस्था सक्षम पणे उभी असल्याचे संस्थेच्या आर्थिक पत्रकावरून दिसून येते.

संस्थेचे सर्व व्यवहार संगणीकृत असुन अल्प व्याज दरात सोनेतारण कर्ज,वैक्तीगत कर्ज,स्थावर मालमत्ता तारण कर्ज,वाहनतारण कर्ज,जुने वाहन कर्ज,मुदतठेव तारण कर्ज इत्यादी सुविधा संस्था देत आहे.यामुळे परिसरातील गरजूंना आर्थिक साह्य मिळत आहे.समता सहकारी पतसंस्थेचे संचालक व कर्मचारी संस्थेच्या सभासद ग्राहकांना कायमच विनम्र व तत्पर सेवा देण्यासाठी कायमच कटिबद्ध राहतील व भविष्यातही अशीच सेवा देण्यासाठी तत्पर राहतील.

संस्थचे सर्व कामकाज सहकार खात्याच्या मार्गदर्शक सुचनानुसार संगणक Core Banking Solution (CBS) प्रणालीव्दारे करण्यात येत आहे.सुदृढ सहकार चळवळी करीता भवितव्यासाठी डिजिटल पेमेंट आणि कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याकरिता संस्थेने Pigmy Colletion,NEFT/RTGS सेवा तसेच आमआदमी डोळ्यासमोर ठेवून संस्थेने ग्राहकांना Mobile Banking सुविधा उपलब्ध करून दिली आहे,सभासदांना अद्यावत डिजिटल सुविधा देण्यासाठी संस्था कायमच बांधील राहील

संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा व ”आदर्श उपविधी” च्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करून वाटचाल करीत आहे.तसेच संस्थेच्या प्रगतीत व सुरू असलेल्या वाटचालीत संस्थेचे सन्मानीय सभासद,खातेदार,हितचिंतक व विद्यमान संचालक मंडळ,कुशल कर्तव्य तत्पर कर्मचारी व दैनंदिन बचत प्रतिनिधी,संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे लेखापरीक्षक,कायदे सल्लागार,आणि यॊग्य व अचूक मार्गदर्शन करणारे सहकार खात्याचे अनेक अधिकारी यांचे योगदान मिळत आहे.

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निरा ता.पुरंदर जि.पुणे

आमच्या ग्राहकांना यशस्वी होण्यासाठी मदत करण्यासाठी वचनबद्ध.

  • Awesome Image
    Awesome Image

    01

    मुदत ठेव

    आपल्या बचतीतुन स्वप्नांना सत्यात
    उतरविणे सहज शक्य आहे!

    बचत करूनच बचतीची सवय लागते आणि नकळतच आपण आपल्या भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार होतो.

  • Awesome Image
    Awesome Image

    02

    संस्थेच्या विविध कर्ज योजना

    व्यवसायस आर्थिक पाठबळ मिळणे
    सहज शक्य आहे!

    'व्यवसाय कर्ज / मालतारण कर्ज' योजने अंतर्गत आम्ही अनेक होतकरू व्यावसायिकांना तत्पर कर्ज पुरवठा करत आहोत.

Flexible EMI Calculator Online

Easily calculate your equated monthly instalment online.

%

Loan EMI

Total Interest Payable

Total Payment
(Principal + Interest)